समुद्रकिनाऱ्यावरील वालुकेश्वर
गुहागर आणि सभोवतालचा परिसर म्हणजे समुद्रवेड्या पर्यटकांसाठी पर्वणीच. स्वच्छ सागरतीर, नितळ पाणी, शुभ्र वाळू, त्यावर फेसाळणाऱ्या लाटा आणि अथांग सागर निळाई हे सगळं अनुभवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील या रम्य ठिकाणी हजारो पर्यटक येतात. गुहागरच्या दक्षिणेला फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे एक विलक्षण समुद्रकिनारा. असगोळी गावचा नितांत सुंदर सागरतीर. आणि या स्थानाला पावन करणारं महादेवाचं अस्तित्व. समुद्राला लागूनच असलेलं अन सुंदर रंगरंगोटी केलेलं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. हे मंदिर पेशवेकालीन असावं हे बांधकामाच्या शैलीवरून लक्षात येतं. आवारात जाताच दगडी दीपमाळ आपलं […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये