• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

हर्णे बंदरातील कनकदुर्ग

April 5, 2020 by chinmayebhave

हर्णे बंदरावर उभं राहून ताजी मासळी विकत घेण्याचा आनंद घेणे ही दापोली-मुरुड भागात हिंडणाऱ्या पर्यटकांची आवडती गोष्ट. तिथंच पाण्यात आतवर गेलेलं जमिनीचे टोक आणि त्यावरील दीपगृह दिसतं. हीच कनकदुर्ग किल्ल्याची जागा. सुवर्णदुर्ग या महत्त्वाच्या जलदुर्गाला सोबत देणारे किल्ले म्हणजे कनकदुर्ग, फत्ते दुर्ग आणि गोवा दुर्ग. गोवा दुर्गाचे बांधकाम अजूनही उत्तम स्थितीत आहे आणि फत्तेदुर्ग कोळी वस्तीने व्यापून टाकलेला आहे. कनकदुर्ग मात्र अवशेष रूपात पाहता येतो. एक बुरुज, पायऱ्या आणि पाण्याची सात टाकी एवढेच काय ते आता शिल्लक आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी • Tags: dabhol, dapoli, fattedurg, gova fort, harnai, harne, kanakadurga, kokan, konkan, murud, shivaji, Shivaji maharaj konkan, suvarnadurga

1

हरवलेला फत्तेदुर्ग

April 2, 2020 by chinmayebhave

सुवर्णदुर्ग किल्ल्याचे तीन उपदुर्ग हर्णे बंदराच्या जवळपास बांधले गेले. कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा दुर्ग. यापैकी फत्तेदुर्गाची जागा जरी आपल्याला माहिती असली तरीही त्याठिकाणी किल्ल्याच्या बांधकामाचे किंवा तटबंदीचे कोणतेही अवशेष आता सापडत नाहीत. कोळी बांधवांच्या वस्तीने हा भाग व्यापून टाकला आहे. सकाळच्या वेळेला हर्णे बंदरावर गेलं की कनकदुर्ग अवशेषांच्या पायऱ्यांवरून फत्तेदुर्गाचे ठिकाण दिसते. कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग यांना जोडणारा दगडी पूल पूर्वी होता आता तिथं मोटर रस्ता आहे. समुद्राच्या बाजूला जुन्या भिंतींचे अवशेष दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळात हा भाग सिद्दीच्या ताब्यात […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी • Tags: angre, dabhol, dapoli, fattedurg, harnai, kanakadurga, kanhoji, khairyatkhan, kokan, konkan, shivaji, shivaji maharaj, siddi, tulaji

Leave a comment

सिद्दीची लंका: जंजिरा

April 2, 2020 by chinmayebhave

मुरुड-जंजिऱ्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर निवांत सुट्टी घेऊन आराम करायचा. शहराच्या धकाधकीपासून दूर शांत, धीम्या आयुष्याची मजा घ्यायची.. आणि मग कंटाळा आला तर एखाद्या सकाळी जवळच राजपुरीला जाऊन जंजिरा किल्ला पाहायचा बेत आखायचा. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करूनही न जिंकलेला हा जलदुर्ग. महाराजांच्या कट्टर शत्रूचे बलस्थान. अबिसीनिया म्हणजेच आजच्या इथियोपियातून आलेल्या सिद्दी लोकांच्या कडवेपणाची आणि शौर्याची कथा समजून घ्यायला इथं गेलं पाहिजे. जंजिरा हे महाराजांचं अधुरं स्वप्नच.. त्यामुळे किल्ला पाहताना आम्हा शिवभक्तांना या गोष्टीची हुरहूर वाटणे साहजिकच आहे. […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: darya firasti, janjira, kokan, konkan, murud, padmadurga, sambhaji, shivaji, shivaji maharaj, siddi surul, siddi yakut

2

निसर्गरम्य आंबोळगड

March 30, 2020 by chinmayebhave

रत्नागिरी जिल्ह्याचा समुद्र किनारा अतिशय सुंदर. रत्नागिरी शहर सोडून दक्षिणेला निघालं की भाट्ये, गणेशगुळे, कशेळी, गावखडी अशी मोहक किनाऱ्यांची मालिकाच पाहता येते. या मार्गाने आपण आंबोळगडला येऊन पोहोचतो आणि आणि किल्ला शोधू लागतो. अर्जुना नदीच्या मुखाजवळ आणि मुसाकाजी बंदराच्या परिसरात बांधलेला हा जलदुर्ग. आज मात्र याचे काही अवशेषच आपण पाहू शकतो. आंबोळगड गावातील बस स्थानकासमोरच एका उंचवट्यावर बुरुजाचे अवशेष आणि जुन्या बांधकामांची जोती दिसतात. पडलेली तोफ दिसते. जुन्या टाक्याचे अवशेषही दिसतात. आंबोळगड किल्ला केवळ अवशेषरूपात शिल्लक असला तरीही गावाच्या सड्यावरून […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: adivare, adiware, ambolgad, gagangiri, godivane, kanhoji angre, kasheli, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, padavane, rajapur

Leave a comment

झुंजार पद्मदुर्ग

March 30, 2020 by chinmayebhave

शीतल कोटणीस आणि रश्मी चेंदवणकर या ब्लॉगपोस्टचे प्रायोजक आहेत. त्यांच्या सहकार्याने पद्मदुर्ग फोटोग्राफीचे काम पूर्ण होऊ शकले. काही ठिकाणे अशी असतात जी आपण काही अंतरावरून पाहिलेली असतात. आपल्याला ती खुणावत असतात. निमंत्रण देत असतात. पण तिथं पोहोचण्याचा योग सहज येत नाही. दरवेळी ही जागा पाहण्याची उत्सुकता वाढतच राहते. असेच एक ठिकाण म्हणजे मुरुड-जंजिऱ्याच्या किनाऱ्यावरून समुद्रात दिसणारा पद्मदुर्ग किंवा कांसा किल्ला. २००१-०२ पासून मी अनेकदा मुरुडला गेलो आहे. तिथं दंडा-राजपुरी जवळ पाण्यात असलेला प्रबळ जलदुर्ग जझिरा-ए-मेहरूब म्हणजे सिद्दीचा जंजिरा सुद्धा पाहिला […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: chhatrapati shivaji, janjira, jivaji vinayak, kanhoji, kansa, kokan, konkan, lay patil, moropant pingale, padmadurg, padmadurga, shivaji, shivrai, siddi

1

खोकरी घुमट

March 27, 2020 by chinmayebhave

कोकणात आणि भारताच्या आरमारी इतिहासात लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्याने आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सिद्दी घराण्याचा दबदबा मोठा होता. अबिसीनिया म्हणजेच इथियोपियातून आलेल्या आणि सुरुवातीला गुलामी करून यथावकाश आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उत्कर्ष साधलेल्या सिद्दींनी उत्तर कोकणावर वर्चस्व प्रस्थापित केले. अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी होता. मुरुडजवळ खोकरी आणि खारशेत नावाच्या गावांच्याजवळ आपण काही घुमट असलेले मकबरे पाहू शकतो. सिद्दी सत्ताधीशांची ही थडगी आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेली ही थडगी आहेत, त्यापैकी सगळ्यात मोठे थडगे सिद्दी […]

Categories: जिल्हा रायगड, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: habshi, habsi, janjira, khokari ghumat, khokri, khokri tombs, kokan, konkan, murud, siddi, siddi khairiyat, siddi surul, siddi yakut khan

5

अंजनवेलचा गोपाळगड

March 26, 2020 by chinmayebhave

वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. प्राचीन काळी नदीच्या पात्रांचा उपयोग व्यापारी वाहतूक करण्यासाठी होत असे. वसिष्ठी नदीतून पूर्वेला चिपळूण पर्यंत जहाजे जाऊ शकत असत. या दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोपाळगडाचा उपयोग होत असे. इतिहास – आज दिसणारा गोपाळगड हे सतराव्या शतकातील विजापुरी म्हणजे […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: anjanvel, dabhol, gopalgad, guhagar, jaladurga, kanhoji angre, khairyatkhan, konkan, maratha navy, sea forts, siddi sat, vashishthi river, vashishti river

Leave a comment

कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे

March 25, 2020 by chinmayebhave

रेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचं चित्रण आम्ही केलं. त्यापैकी काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. वाळूची पुळण, समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल, निळ्या आकाशाशी क्षितिजरेषेला भिडणारी सागर निळाई. प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. कुठं पर्यटकांचा गजबजाट तर कुठं अस्पर्श […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, संकीर्ण, समुद्रकिनारे • Tags: alibag, जिल्हा रत्नागिरी, bhandarpule, bhogawe, budhal, dabholi, dapoli, ganpatipule, guhagar, harnai, karde, kashid, kelshi, kokan, kondura, konkan, malvan, mochemad, murud, nivati, velaneshwar, wayangani

12

घारापुरीचा इंग्लिश किल्ला

March 24, 2020 by chinmayebhave

मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड • Tags: खोदीव लेणी, dhavalikar, elephanta, elephanta fort, gharapuri, gharapuri fort, kalachuri, maurya, satvahana, spink, suraj pandit, vakataka, walter spink

Leave a comment

सागर सखा किल्ले निवती

March 22, 2020 by chinmayebhave

निवती आणि भोगवे या दोन अप्रतिम समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला किल्ले निवती म्हणजे दर्याचा दोस्तच. ब्लू फ्लॅग चं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला शुभ्र वाळूचा किनारा पाहायला सर्वात योग्य जागा म्हणजे किल्ले निवतीचा उत्तरेकडे असलेला बुरुज. गोड मालवणी बोली, तितकेच गोड शहाळ्याचे पाणी, खारा पण थंड सागर वारा, नितळ निळाईचे विविध अविष्कार दाखवणारा समुद्र, नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी स्वच्छ सफेद वाळू बरोबर केलेली रंगसंगत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी दृष्टीने आणि दृढनिश्चयाने रचलेला इतिहास या सगळ्यांच्या मिश्रणातून घडलं आहे […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा सिंधुदुर्ग, darya, darya firasti, firasti, fort nivati, fort nivti, konkan, nivati, nivti, sawantwadi, shivaji, shivrai, vengurla

Leave a comment

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • दर्शन सोमेश्वराचं
  • हर्णे बंदरातील कनकदुर्ग
  • सावंतवाडीचा राजवाडा
  • नाटेचा यशवंतगड
  • कहाणी कुणकेश्वराची
  • राममंदिर केळशीचे
  • आंबव चा सूर्यनारायण
  • करमरकर शिल्प संग्रहालय
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

English World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...